श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजने IIT प्रवेशाच्या जेईई परीक्षेत मोठे यश मिळविले असून यश संपादन केलेले विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार रविवार दि. १७ ऑक्टोबर रोजी करण्यात आला.हे यश जरी भोसले हायस्कूलचे असले तरी क्रेडीट मात्र कांही खासगी कोंचिग क्लासेस चालविणारे घेतात, अशी खंत संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. 
भोसले हायस्कुलचा अमेय भिरंगे या विद्यार्थ्यांने पहिल्याच प्रयत्नात IIT ची जेईई परीक्षा पास झाला आहे.  या कॉलेजमधील 6 विद्यार्थी या परीक्षेस बसले होते त्यातील 4 जण हे उत्तीर्ण झाले आहेत त्यात तनया दहातोंडे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .यावेळी विद्यार्थी व शिक्षक संजय मिश्रा,ममता मिश्रा,योगेश मिश्रा व ब्रिजमोहन पासवान या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.शिक्षण व्यवस्थेतील व कांही कोचिंग क्लासच्या मार्केटिंगचे वास्तव मांडत पाटील यांनी आरोप केले. आमच्या भोसले हायस्कुल व कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी विविध परीक्षेत यश मिळविले की त्यांना पैसे देऊन काही खासगी कोचिंग क्लासेस तो विद्यार्थी त्यांच्या इथे शिक्षण घेतल्याचा व त्यामुळेच यश  संपादन केल्याचा फोटो छापतात. कोचिंग क्लास त्यांचे मार्केटिंग व्हावे व इतर विद्यार्थी त्या ठिकाणी क्लासला येण्यासाठी आकर्षित होण्यासाठी हा मार्ग वापरतात असे पाटील म्हणाले. आमचा या प्रकाराला विरोध नाही किंवा आजवर विरोध केला नाही मात्र हे प्रकार चुकीचे व दिशाभूल करणारे आहेत त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी खरच तो यश मिळालेला विद्यार्थी त्या ठिकाणी होता का याची खात्री करावी, त्यांच्या समोर सत्य येईल. खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणारे सुद्धा शिक्षक आहेत त्यावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष करीत असतो व त्यांना विरोध करीत नाही, असेही पाटील यांनी सांगितले. 
उस्मानाबाद पॅटर्न निर्माण करणार
कोरोनाच्या संकटात ऑनलाईन व ऑफलाईन अभ्यासक्रम व अडचणींवर मात करीत भोसले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी हे  यश मिळविले आहे.  भोसले हायस्कुलमध्ये कोटा, हरियाणा, दिल्ली,हैद्राबादयेथील अनुभव संपन्न स्टाप आहे. त्यामुळेच आगामी काळात उस्मानाबादला शैक्षणिक हब व वेगळा उस्मानाबाद पॅटर्न बनविणार असल्याचा मानस आदर्श शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. हायस्कुलमधील प्राध्यापकांची निवड विद्यार्थी स्वत: ८ ते १० तास उपस्थित राहून करतात.त्यानंतरच प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते, असेही पाटील यांनी सांगितले. 
उस्मानाबाद येथील विद्यार्थ्यांची आकलनशक्ती , उत्सुकता ही चांगली आहे तसेच हे विद्यार्थी लक्ष देऊन , मन लावून अभ्यास करतात त्यामुळे आगामी काळात इथला विद्यार्थी यशाची सर्वोच्च शिखरे पार करील असे मत प्रा.संजय मिश्रा यांनी व्यक्त केले. शेजारील लातूरसह अन्य जिल्ह्यात शिक्षनासाठी न जाता भोसले कॉलेजमध्ये शिक्षण घेण्याचा निर्णय योग्य ठरल्याचे मत विद्यार्थीनी व्यक्त केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष  सुधीर पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी   आदित्य पाटील, प्राचार्य  देशमुख एस.एस. व उपप्राचार्य श घार्गे एस.के. पर्यवेक्षक  हाजगुडे टी.पी.व  भगत सर यांनी व सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.
 
Top