तुळजापूर  / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरीटेबल ट्रस्ट तुळजापूरच्या वतीने आयोजित मोफत आयुर्वेदिक न्युरोथेरेपी मेडिकल शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन  रोचकरी,  महंत तुकोजीबुवा,  महंत वाकोजी बुवा,  नगरसेविका अश्विनीताई रोचकरी, नगरसेवक विजय आबा कंदले , माजी नगरसेवक अमर  हंगरगेकर, संयोजक विशाल  रोचकरी, अनंत सावंत डाॅ. माॅमडेल,डाॅ. नारायण मुंडाळा, डा. नागेश हाकेन  यांच्या हस्ते झाले.

शिबरामध्ये पहिल्या दिवशी ६७८ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.  यावेळी पत्रकार गुरुनाथ बडूरे , माजी नगरसेवक राजेश शिंदे, निलेश रोचकरी ,अश्विनी शिंदे, डाॅ. कमल किशोर कावडे, डॉ. वंदना, डॉ. निशा, लक्ष्मीताई हंगरगेकर वैशालीताई धरणे, ज्योतीताई सावंत आदी उपस्थित होते.

 प्रस्ताविक डॉ. माॅमडेल यांनी केले. यावेळी आरोग्य विषयाची माहिती विठ्ठलराव जाधव यांनी दिली.   सूत्रसंचालन महेंद्र कावरे सर यांनी केले. सदरील शिबीर ३ दिवस चालणार असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक विशाल  रोचकरी यांनी केले असून सदरील शिबिर यशस्वी करण्यासाठी निलेश रोचकरी गणेश रोचकरी सर, महेंद्र पाटील सर,उमाकांत रणदिवे, श्रीधर शिरसागर,बाबा खपले, दत्ता शिरसागर, विजय काकडे, अमित देवकर, बाळूमामा गुरव परिश्रम घेत आहेत. 

 
Top