तेर/ प्रतिनिधी

 प्रोमिथीन स्पेंटा टेक्नॉलॉजी प्रा.लि.व  स्वयम शिक्षण प्रयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने   महिला आपल्या पायावर अर्थिक सक्षमपणे उभ्या राहाव्या म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात विविध ठिकाणी विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात 50 गावात महिला दूध डेअरी चालवितात.

प्रोमिथीन स्पेंन्टा टेक्नॉलॉजी प्रा लि व‌ स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी दुध संकलन केंद्र उस्मानाबाद जिल्ह्यातील ५० गावात चालू आहे व तसेच संपूर्ण जिल्हाभर दुध संकलन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. लक्ष्मी दुध डेअरी ही संपूर्ण महीलांसाठी डेअरी असुन दुधाचे पैसे थेट महिला शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होतात.जिल्हयात प्रति दिनी 10 हजार लिटर दूध संकलन केले जाते. दुध संकलन हे संपुर्ण ऑनलाईन पद्धतीने आहे. महीला  शेतक-यांना यांना दुधाच्या फॅट नुसार दर दिला जात आहे अशी माहिती डेअरी चे शाखाधिकारी स्वामीराव भोरे यांनी दिली.सहकारी शाखाधिकारी अविनाश भगत, प्रकल्प शाखाधिकारी तब्बसुम मोमीन, ब्लॉक ऑफीसर सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुध संकलन करणाऱ्या महिला काम करीत आहेत.तसेच सभासदांना पशुधन विषयी मोफत मार्गदर्शन केले जाते अशी माहिती डेअरी चे शाखाधिकारी स्वामीराव भोरे यांनी दिली.

 
Top