वाशी/ प्रतिनिधी

ग्रामीण रुग्णालय वाशी येथे मा. उपसंचालक डॉ.एकनाथ माले , मा. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय पाटील , व मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ कपिलदेव पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. तालुका विधी सेवा समिती वाशी, विधीज्ञ मंडळ वाशी व ग्रामीण रुग्णालय वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. 

  “ आझादी का अमृत महोत्सव ॲक्शन प्लॅन 2021-2022 अंतर्गत विधी साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सं. मा. कोळेकर, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती वाशी हे उपस्थितीत. होते. त्यांनी उपस्थित रुग्ण व नातेवाईक तसेच रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मानसिक विकलांग आरोग्या विषयी विविध सुविधा व कायदे विषयी 2015 बाबत मार्गदर्शन केले.ॲड.एस.एन.कावळे यांनी ही मानसिक आरोग्य व विमा याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद पवार सर यांनी मानसिक आरोग्य व प्रकल्प प्रेरणा याविषयी मार्गदर्शन केले व जास्तीत जास्त नागरिकांनी आपले आरोग्य चांगले ठेवावे तसेच कोणाला त्रास असेल तर 104 या टोल फ्री नंबर वर संपर्क साधून समस्याचे निराकरण करावे याविषयी मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन समुपदेशक श्री. परमेश्वर तुंदारे यांनी केले. या कार्यक्रमास वाशी विधी मंडळाचे अध्यक्ष ॲड. श्री.अनंत पवार, ॲड. श्रीमती  शांता . आर. देशमुख, ॲड. श्रीमती अश्विनी एस. कुंभार, ॲड. श्री. पी. जे. देशमुख व तालुका विधी सेवा समिती चे सदस्य व रुग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे आभार एनसीडी समुपदेशक श्री. उत्तरेश्वर उबाळे यांनी मानले.

 
Top