तेर/ प्रतिनिधी

पर्यावरण संतुलनचा संदेश देत यवतमाळ जिल्ह्यातील पुनवट येथील 21 वर्षीय प्रणाली चिकटे  वर्षभरापासून 14 हजार किलोमीटरचा सायकल प्रवास  करून  उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आली.

यवतमाळ जिल्ह्यातील वाणी तालुक्यातील पुनवट येथील प्रणाली चिकटे ही 21 वर्षीय युवती प्रणाली चिकटेहीने  20 आक्टोबर 2020 पासून यवतमाळ जिल्ह्यापासून सायकल प्रवासास सुरूवात केली. ही युवती आपल्या आरोग्यासाठी वायू व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मोटार गाडीचा वापर टाळून शक्य ती कामे सायकलने करू या, प्लास्टिक आणि बाटल्यांचा वापर टाळू यात, घराबाहेर पडताना कापडी पिशवी व पाण्याची बॉटल सोबत ठेवू या, परिसरात स्थानिक झाडे लावू या व जगवू या, अनावश्यक वस्तूंचा गरजा टाळून अत्यंत आवश्यक वस्तूंचा वापर करू या, आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवू या आणि आपले आरोग्य सुधारू या, पाणी बचत व पाणी जिरवा या कामात सहभाग घेऊ या हा संदेश नागरीकांना देत ही युवती राज्यभर सायकलवर फीरून संदेश देत आहे.दिवसभरात  सत्तर किलोमीटर प्रवास युवती करते.सायकल प्रवासात प्रत्येक गावातील नागरिक सहकार्य करतात.ही प्रेरणा मनातूनच निर्माण झाली.14 हजार किलोमीटरचा प्रवास करून आज उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे आज येऊन त्यांनी नाकरीका बरोबर संवाद साधला.तेर येथे तिचा उषाताई मुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी दत्तात्रय मुळे,रेवणसिद्धप्पा लामतुरे, दिपक खरात,नरहरी बडवे, नवनाथ पांचाळ, प्रविण साळुंके आदी उपस्थित होते.

 
Top