उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना योध्यावर दिवाळीपुर्वी संक्रांत आली आहे, उस्मानाबाद जिल्ह्यातील 143 कंत्राटी डॉक्टर व कर्मचारी कार्यमुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या डॉक्टरांचे गेल्या 3 ते 4 महिन्यांचे वेतन थकीत असल्याने उपासमारीची वेळ आली असतानाच त्यांना वैद्यकीय सेवेतुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाश्ल्यचिकित्स डॉ.धनंजय पाटील यांना विचारले असता. त्यांनी राज्य सरकार ने आदेश दिल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीने १४३ कर्मचारी, डॉक्टरांचीसेवा खंडीत करण्यात आली असल्याचे सांगितले. एसडीआरएफ मधुन वेतनासाठी निधी नसल्याने व कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी हे आदेश दिले असुन 31 ऑक्टोबर पासुन कार्यमुक्त केले आहे. विशेष म्हणजे या कोरोना योध्यानी कोरोना संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालुन रुग्णसेवा केली होती तरी देखील त्यांचे वेतन थकीत आहे. 

कार्यमुक्त करण्यात आलेले डॉक्टर व कर्मचारी हे डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल उस्मानाबाद व विद्यापीठ उपकेंद्रातील कोरोना लॅबमध्ये कार्यरत होते. डॉक्टर, फार्मासिस्ट,लॅब व एक्स रे टेक्निशियन, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय यांचा समावेश आहे. अचानक यांना कार्यमुक्त केल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

 
Top