तुळजापूर/ प्रतिनिधी-

केंद्र सरकारने विद्यार्थ्यांसाठी लसींचा स्वतंत्र पुरवठा करून विद्यार्थ्यांचे महाविद्यालय स्तरावर स्वतंत्र लसीकरण करावे अन्यथा या मागणी दखल न घेतल्यास जिल्हयात   राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आंदोलन  करणार, असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष दुर्गश साळुंके यांनी दिली. 

 गेल्या दिड वर्षांपासून देशातील महाविद्यालये बंद आहेत. देशातील संपूर्ण जनतेच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकाने उचलली आहे. केंद्र सरकार राज्यांना लसींचा पुरवठा करत असून त्या पुरवठ्या नुसार लसीकरण सुरू आहे. राज्य शासनाकडून होणारी मागणी आणि केंद्र शासनाकडून होणारा पुरवठा यांमध्ये सातत्याने तफावत आहे.  विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महाविद्यालये सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा. विद्यार्थ्यांचे नुकसान म्हणजे एका पिढीचं नुकसान,त्यासाठी ही मागणी पूर्ण होईपर्यंत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हयात सर्वञ  पदाधिकारी आपापल्या भागात लोकशाही मार्गाने विविध स्वरूपात आंदोलन करणार आहेत.  

 
Top