तुळजापूर/ प्रतिनिधी-

 तालुक्यातील  सुरतगाव -सावरगाव -काटी या चौदा किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत  असल्याने हा रस्ता सध्या पावसाळ्यात  प्रवासासाठी धोकादायक बनला आहे.

   प्रारंभी या रस्ताचे  काम वेगाने  करण्यात आले , माञ  गेली काही दिवासापासून  काम पूर्णपणे बंद असल्याचे पाहायला मिळत आहे, काही ठिकाणी साईटपट्टी  न भरता अर्धवट ठेवल्या आहेत.  याचबरोबर साईडपट्टीसाठी रेसवड मुरूम आणि लाल मातीचा वापर करण्यात आले  असल्याची ग्रामस्थ सांगत आहेत. कामाच्या ठिकाणी सूचनाफलक दिशा फलक  नाहीत ते लावल्यास अपघात घडण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

या रस्ताचे काम अंदाजपञका नुसार केले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांन मधुन  होत  आहे. पुल बांधकाम करताना नियमानुसार साहित्य वापरणे गरजेचे असताना दुसरे कमी दराचे  साहित्य वापरल्याचा आरोप केला जात आहे. तरी काम दर्जदार व वेळेत  करुन या भागातील प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

 
Top