काटी / प्रतिनिधी- 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील मातीतून कलाकृती साकारणारे शिक्षित श्रीकांत बबन कुंभार व मंगेश बबन कुंभार या दोन बंधूंनी सध्याच्या स्टेनलेस  स्टीलच्या जमान्यात मातीची भांडी दिसेनाशी झाली असताना या बंधूंनी कुंभार कलेला आपल्या कुंभारवाड्यातच जखडून ठेवता आपला परंपरागत व्यवसाय सांभाळत श्री आर्ट्स कार्यशाळेत साकारलेल्या अतिशय सुंदर,आकर्षक, गौरी लक्ष्मीच्या मुखवट्यांना महाराष्ट्रासह,केरळ, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक व राजस्थान या राज्यात तर विदेशात अमेरिका, कॅनडा, कुवेत सारख्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळविल्याबद्दल व काटी गावचे नाव आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेल्याबद्दल मंगळवार दि. 15 रोजी सायंकाळी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वडिल बबन कुंभार यांच्यासह श्रीकांत कुंभार व मंगेश कुंभार या दोन्ही बंधूंचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.

 यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, शाखा अध्यक्ष धनाजी गायकवाड, सचिव बळी चवळे, त्रिगुणशील साळुंके, बबन हेडे, नजीब काझी, रामेश्वर लाडुळकर,राजु साळुंके, राजेंद्र हांडे, रघू आगलावे, मोहन आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top