केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना दिले निवेदन


उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तुळजापूर रेल्वे मार्गाबाबत  मोदी सरकार सर्व त्या गोष्टी करत आहे. उस्मानाबाद मध्ये ड्राय पोर्ट व्हावे ही मागणी चांगली असून याबाबत शक्यता तपासल्या जातील आणि सकारात्मक पावले उचलली जातील असे रेल्वे राज्यमंञी रावसाहेब दानवे यांनी योगेश केदार यांना सांगितले.यावेळी योगेश केदार यांनी उस्मानाबादेत ड्राय पोर्ट आणि रेल्वे मध्ये स्थानिकांना नोकऱ्या मध्ये प्राधान्य द्यावे या मागणीचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की,  सोलापूर- तुळजापूर -उस्मानाबाद रेल्वे मार्गातील जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रकल्पग्रस्त दर्जा देऊन नोकरी किंवा रोजगरामध्ये प्राथमिकता देणे तसेच उस्मानाबाद मध्ये ड्राय पोर्ट उभे केले जावे,  उस्मानाबादेत भारतीय रेल्वेने  ड्राय पोर्ट उभं केलं तर देशासाठी आणि आमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त होईल. मूलतः हा भाग कोरडा आहे. दमट हवामान नसल्याने कमी खर्चात इथे अन्नधान्य सुरक्षित राहील. देशभरातील केंद्र सरकारने खरेदी केलेले अन्नधान्य साठवण्यासाठी मोठे गोडवून उभे करता येतील. भारतातील अन्न धान्य हब म्हणून हा परिसर उदयास येऊ शकतो. डाळी, तेलबिया, कापूस, व इतरही अनेक पिके या भागात होतात. यावर प्रक्रिया उद्योगही उभे राहतील. त्यांना थेट परदेशात एक्सपोर्ट करण्यासाठी व्यवस्था व्हावी या उद्देशाने या भागात ड्राय पोर्ट उभे राहिल्यास जिल्ह्याला तसेच अजू बाजूच्या जिल्ह्यांना सुद्धा खूप फायदा होईल. 

तगर म्हणजे आजचे तेर हे सातवाहन काळात जगातील महत्वाचे व्यापारी केंद्र होते. इथून जगात सगळीकडे वस्तू पाठवल्या जायच्या. त्याअर्थी आमच्या उस्मानाबादचा जगातील इतर राष्ट्रांचे सोबत थेट संबंध होता. तो पूनारप्रस्थापित करण्याची संधी आपल्यामुळे चालून येईल  असा उल्लेख केला आहे. 

 
Top