परंडा / प्रतिनिधी : - 

राष्ट्रीय लोक अदालत यांच्या सहकार्याने व भारतीय स्टेट बँक शाखा परंडा यांच्या सौजन्याने एकूण २५ थकीत शेतकरी कर्जदार, बचत गट, व्यवसायिक कर्जदार इत्यादी लाभार्थी यांना ३० लाखाच्यावरती माफी झाली असून खातेदार यांनी शनिवार दि.२५ रोजी लोकअदालत व बँक यांची तडजोड कर्ज ची रक्कम १५ लाख भरून तब्बल ३० लाख रू.वरती शेतकरी यांना माफी मिळाली असुन यामुळे शेतकरी यांना दिलासा मिळाला आहे.तसेच भारतीय स्टेट बँक शाखा परंडा यांचे आभार मानले.

यावेळी उपस्थित मुख्य प्रबंधक रिजनल ऑफीस उस्मानाबाद चे शरद कोले, बँक मॅनेजर निलेश निवृत्ती बोंबले, सोनारी बँक मॅनेजर पठाण , फिल्ड ऑफीसर गुप्ता ,ऑफिसर अभयसिंहराजे मोहिते, समन्वयक महेश पाटील, गजानन आगरकर, नानासाहेब केमदारणे, राणी साखरे आदी उपस्थित होते.


 
Top