परांडा / प्रतिनिधी :- 

येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयांमध्ये जागतिक हृदय दिन आणि राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त सोमवार दि. 27 आणि मंगळवार दि.28 सप्टेंबर 20 21 रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता आश्वासन सेल ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्ट  उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.उस्मानाबाद येथील रुरल हेल्थ प्रोग्रेस ट्रस्टचे डॉ अरुण मोरे ,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दिपा सावळे यांच्या उपस्थितीमध्ये दिनांक 27 सप्टेंबर रोजी शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या शिबिरा मध्ये ब्लड प्रेशर, ईसीजी ,शुगर चेक अशा मोफत तपासणी तसेच दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता हार्ट अटॅक ,अर्धांग वायू टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर .डॉ.अरुण मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिराचे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आयोजन केले आहे. ऑनलाइन शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी झूम ॲप द्वारे सहभागी होता येईल त्यासाठी संबंधित लिंकचा आयडी आणि पासवर्ड दिला जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचा फायदा घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी केले आहे. शिबिराचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता आश्वासन सेल अर्थात आय क्यू ए सी चे चेअरमन डॉ.महेशकुमार माने यांनी केले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.महेशकुमार माने, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ.सचिन चव्हाण, प्रा.साबळे, संस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.चंदनशिवे हे सहकार्य करीत आहेत.


 
Top