परंडा / प्रतिनिधी : - 

 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उस्मानाबाद ( ए डी ओ) एम.डी.तिर्थकर  यांच्या हस्ते परंडा तालुक्यातील गटांनी उत्कृष्ट  कामगिरी केल्याने रानभाजी महोत्सव मध्ये सहभाग घेतल्याबद्दल श्री गणेश शेतकरी गट भोंजा हवेली, श्री गणेश शेतकरी गट पिस्तमवाडी, विठ्ठल चव्हाण व इतर गटांना प्रमाणपञ वितरण करण्यात आले व शुभेच्छा दिल्या.तिर्थकर साहेब यांची उस्मानाबाद जिल्ह्यात खुप मोठी विविध विषयांवर संकल्पना असल्यामुळे गटांना प्रोत्सहान मिळत आहे.

  प्रमाणपञ वितरण करताना  यावेळी उपस्थित ( ए डी ओ) एम.डी.तिर्थकर ,सोनटक्के , लघुउद्योग सल्लागार गणेश नेटके, उद्योजक विकास रणनवरे व लघुउद्योग सल्लागार गणेश चव्हाण आदी उपस्थित होते. 

 
Top