उस्मानाबाद / प्रतिनिधी-


शिवराज्याभिषेक सोहळा समिती उस्मानाबाद यांच्या वतीने   दि.28 सप्टेंबर रोजी समितीची नूतन कार्यकारिणी नियुक्तीसाठी शासकीय विश्रामगृह येथे कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

आयोजित बैठकीत एकमताने अध्यक्षपदी श्री. शशिकांत दगडू खुने यांची निवड करण्यात आली. तसेच समितीचे उपाध्यक्षपदी श्री. धर्मराज आण्णासाहेब सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली तसेच समितीचे सचिवपदी श्री दत्तात्रय रावसाहेब साळुंके याची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. नूतन पदाधिकारी यांच्या निवडी जाहिर होताच कार्यकर्त्यांनी शासकिय विश्रामगृह व छत्रपती शिवाजी महाराज चोक येथे फटाके फोडून, गुलाल उधळून व पेढे वाटुन आनंद साजरा केला, यावेळी नूतन पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन केले कार्यकर्त्यांनी घोषणांनी व फटाक्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे उस्मानाबाद चे सर्व पदाधिकारी व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top