उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्ह्यात गेली १० ते १५ दिवसांपासून अतिवृष्टी होऊन जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे शासनाने पंचनामे न करता जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर यांनी दि २९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. १० ऑक्टोंबर २०२१ पर्यंत शासन स्तरावर मागण्या मान्य नाही झाल्या तर शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात शेतकर्‍यांना सोबत घेऊन तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येणार असल्याचा इशाराही या निवेदनातून दिला आहेे.

 या निवेदनावर शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष रामजीवन बोंदर, जीवनराव देशमुख, सुधीर नायकल, दत्ता पाटील ,नवनाथ जाधवर, सिद्धेश्वर सुरवसे ,संतोष राठोड यांच्या सह्या आहेत

 
Top