उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पालकमंत्री शंकरराव गडाख यांना भाजपच्या वतीने निवेदन देऊन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी करण्यात अाली अाहे.पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या उपस्थितीत हे निवेदन देण्यात अाले.

भाजपने म्हटले अाहे की, जिल्ह्यात एक आठवड्यात माेठा पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसात तर पावसाने हाहाकार माजविला आहे, अनेक गावात अभूतपूर्व अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावात पाहणी केली असता पूर परिस्थितीमुळे या भागातील सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होवून मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. यात शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाचे काढणीला आलेले व काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले असून ऊसासारखे पिक देखील आडवे झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन तातडीने विशेष मदत जाहीर करावी, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी तातडीने कोरडवाहू पिकांना सरसकट हेक्टरी २५ हजार रूपये तर बागायती व फळपिकांना हेक्टरी ५० हजार रूपये मदत (पीक विम्या व्यतिरिक्त) १५ दिवसाच्या आत देण्यात यावी. यावेळी नेताजी पाटील, सुनील काकडे, पिराजी मंजुळे, रामदास कोळगे, नितीन भोसले, प्रदिप शिंदे, राजसिंहा राजेनिंबाळकर, संजय पाटील अादी उपस्थित होते.


 
Top