उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राज्यसरकारला जर कठोर आणि ठोस पाऊले उचलता येत नसतील तर तुमची सत्ता काय कामाची? असा घणाघात आरोप भारतीय जनता महिला ,युवती आणि युवा मोर्चा उस्मानाबाद यांच्या वतीने निवेदनाद्वारे  पोलिस अधिक्षक व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेल्या निवेदनात राज्य सरकारवर करण्यात आला आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, हा महाराष्ट्र संतांचा आहे. हा महाराष्ट्र महापुरुषांचा आहे. हा महाराष्ट्र क्रांतिकारकांचा आहे. हा महाराष्ट्र थोर समाजसुधारकांचा आहे.. एवढ्या मोठ्या संस्कृतीचा वारसा या महाराष्ट्राला मिळालेला असताना आज काय पहायला मिळतेय तर दररोज महिलांवर होणारे अत्याचारच.... स्त्री म्हणून जन्म घेतल्याची लाज आता मात्र खरच वाटु लागली आहे... कधी एखादे गिधाड येईल आणि आमच्या आया बहिणींच्या अब्रूचे धिंदवडे काढेल याचा आता नेम राहिला नाही आणि याला कारणीभूत म्हणजे कायद्याचा धाकच राहिला नाही...   फक्त कठोर कायदे करुन काहीही उपयोग नाही तर त्याची अंमलबजावणी सुद्धा कठोर पध्दतीनेच झाली पाहिजे तर आणि तरच समोरचा विकृत अशा प्रकारचे कृत्य करताना हजारवेळा विचार करेल. पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेणाऱ्या राज्यात महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार?

 एका आठवड्यात सलग ही सहावी घटना घडत आहे. कधी थांबणार स्त्रियांच्या अब्रूची लक्तरे? आमच्या आया , बहिणी, लेकी बाळा आज आमच्याच समाजात सुरक्षित नसतील तर महिला म्हणून आम्ही नक्की कुठे दाद मागायची?  मुंबईमधील साकीनाका परिसरात एका 32 वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची संतापजणक घटना दि. १० सप्टेंबरला समोर आली. ही घटना 9 सप्टेंबर रोजी घडली. आरोपीने बलात्कारानंतर पिडितेच्या गुप्तांगात लोखंडी सळई टाकण्याचं अमानुष अस कृत्य केलं. झालेली ही घटना अतिशय निंदनीय व माणूसकीला काळीमा फासणारी असुन ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवुन आरोपींना तात्काळ फक्त आणि फक्त फाशीच देण्यात यावी असे निवेदन भारतीय जनता महिला ,युवती आणि युवा मोर्चा धाराशिवच्या वतीने पोलिस अधिक्षक   आणि जिल्हाधिकारी   यांना देण्यात आले.

 त्यावेळी महिला मोर्चाच्या अर्चना अंबुरे,  युवती मोर्चा प्रदेश विभागीय उपाध्यक्ष पुजा देढे, युवती जिल्हाध्यक्ष पुजा राठोड आणि युवा मोर्चा सरचिटणीस देवकन्या गाडे उपस्थित होत्या.


 
Top