उस्मानाबाद / प्रतिनिधी-

ऑक्टोबर २०२० मध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार सुजितसिंह ठाकूर यांना कोरोनाचे निमित्त झाले आणि ते आजारी पडले. त्यामुळे राज्यात व जिल्हयात भाजपाची धडाडणारी तोफ मुक झाली होती. गेल्या वर्षभर मुक झालेली तोफ परत एकदा धडाडली. निमित्त होते प्रतिष्ठाण भवन येथे  भाजपाच्या बुथ कमिटीची आढावा बैठकचे ! यामध्ये आमदार ठाकूर यांच्यामध्ये दिसला ‘फिर वही जोश’, अशी चर्चा कार्यकर्त्यामध्ये दिसून आली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये परत एकदा उत्साह पाहायला मिळाला. 

परंडा येथून पत्रकारितेला सुरुवात करून आपल्या अथक परिश्रमाने भाजप मध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले. कोणाचाही आर्शिवाद नसताना आमदार ठाकूर यांनी स्व:हिम्मतीवर पक्षातील पदे पादाक्रंत केली. सर्व सामान्य कार्यकर्ता ते पक्षातील उच्च नेत्यापर्यंत आमदार ठाकूर यांनी आपुलकीचे व चांगले संबंध निर्माण झाल्यामुळे कांही वर्षांतच त्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. भाजपची सत्ता असताना केंद्र व राज्यातील अनेक विकास कामाबाबत त्यांनी तळमळीने प्रश्न मांडले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रीमंडळातील अन्य मंत्र्याशी चांगल्या समन्वयामुळे जिल्हयाचे अनेक विकासात्मक प्रश्नाला त्यांनी चालना दिली होती. 

रविवार दि. १२ सप्टेंबर रोजी भाजपच्या बुथ कमिटीच्या आढावा बैठकीत त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. शेतकरी पिक विमा, आेबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, वाढत्या महिला अत्याचार वसूली नाट्य आदी विषयावर आमदार ठाकूर यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तौफ डागली. त्यामुळे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये परत एकदा उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले. यावेळी मराठवाडा संघठनमंत्री म्हणून संजय कौंडगे, संघटन मंत्री रमेश पोकळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे,भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष राजनाथसिंह राजेनिंबाळकर,  माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, प्रदेश कार्यकारणी सदस्य अॅड. व्यंकटराव गुंड, सुधीर पाटील, अॅड. खंडेराव चौरे,अॅड.अनिल काळे, संताजी चालुक्य, रामदास कोळगे, ज्ञानदेव राजगुरू, दत्ता सोनटक्के यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. 


 
Top