उस्मानाबाद / प्रतिनिधी - 

मल्टीस्टेटच्या माध्यमातून वाशी व आजूबाजूच्या गावांतील तरूणांना उद्योग क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी त्यासाठी मल्टीस्टेटच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. मल्टीस्टेटच्या सुविधा ATM, NEFT, RTGS, IMPS, QR कोड, मोबाईल बॅकींग, लाॅकर सुविधा दिल्या जाणार असल्याने नागरिकांमध्ये विश्वासाचं नातं अभिजीत पाटील व त्यांच्या मल्टिस्टेटने केले आहे. डिव्हीपी उद्योग समूहाचे “आम्ही जपतो सर्वकाही” हे आपले ब्रीदवाक्य ही संस्था सार्थ ठरवेल अशा विश्वास धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला. 

 यावेळी शिवसेना नेते प्रशांत बाबा चेडे, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक केशव सावंत, वाशी नगराध्यक्ष नागनाथ नायकवडी, शिवसेनेचे नेते विकास मोळवणे, पंचायत समिती सदस्य रमेश पाटील, मा.नगराध्यक्ष निश्चित चेडे, उपनगराध्यक्ष प्रसाद जोशी, राष्ट्रवादी नेते संतोष कवडे, व्यापार संघटनेचे भारत मोळवणे, कृषी उत्पन्न समिती सदस्य विकास पवार, राष्ट्रवादी युवा नेते ॲड सूर्यकांत सांडसे, संतोष पवार, प्रगतीशील शेतकरी तानाजी गवारे,विकास.का.सो.सा. चेअरमन श्रीकांत मोरे, रविराजे देशमुख, बाबा पाटील,इंदापूर या आदी मान्यवरांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. 

 उत्कृष्ट व पारदर्शक कारभारामुळे जनमानसात धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी मल्टीस्टेटचे विश्वासाचं नातं निर्माण केले आहे. त्याच विश्वासाच्या जोरावर वाशी येथील मल्टीस्टेट उच्चांक स्तरावर जाईल असा विश्वास शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे बोलताना म्हणाले. 

 याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, आबासाहेब खारे, संदिप खारे, दीपक आदमिले, विकास काळे तसेच मल्टीस्टेटचे चेअरमन सुरज पाटील, सीईओ भुतेकर यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


 
Top