तुळजापूर/ प्रतिनिधी-

 उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 4 मधील  जिल्हा परिषद  कन्या प्रशाला येथे घेण्यात  लसीकरण  शिबीरात रेकाँर्ड ब्रेक  ५२३ जणांचे लसीकरण बुधवार दि.२२ रोजी करण्यात आले. प्रभाग क्रमांक 4 मध्ये18 वर्षापुढील  नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा  डोस देण्यात आला. यावेळी नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद होता.

यावेळी नगरसेवक सुनिल रोचकरी, करण साळुंके, दुर्गेश साळुंके, सुदर्शन वाघमारे,राहुल भालेकर,अक्षय सुरवसे  आदि उपस्थित होते. 


 
Top