उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथे बदली होऊन आलेल्या नवनियुक्त पोलिस अधीक्षक नीवा जैन यांनी बुधवारी पदभार स्वीकारला आहे. त्यांचे स्वागत पूर्वीचे पोलिस अधीक्षक राजतिलक रौशन यांनी केले.

येथील पोलिस अधीक्षक रौशन यांची बदली गेल्या आठवड्यात झाली आहे. त्यांच्या जागी नीवा जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रौशन यांनी पदभार सोडलेला नव्हता. मंगळवारी त्यांनी पदभार सोडल्यानंतर जैन यांनी पदभार स्वीकारला. त्यांना रौशन यांनी पदभार स्वीकारला. तसेच अपर पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार नवनीतकुमार काँवत यांनी स्वीकारला आहे.

 

 
Top