उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जगातील सर्वात मोठया लोकशाही असलेल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संबंध देशभरात 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात सेवा समर्पण सप्ताह सुरू आहे, त्या अनुषंगाने उस्मानाबाद जिल्ह्याचे नेते आ.सुजितसिंह ठाकूर व आ.राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली   भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा भूम यांच्या वतीने, तसेच भाजयुमो जिल्हा सरचिटणीस ॲड. कुलदीपसिंह भोसले यांच्या पुढाकाराने भूम शहरात केंद्र सरकारच्या उपलब्धीचे चित्ररूपी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला, त्यानंतर कुलदीप भोसले, जिल्हा सरचिटणीस आदम शेख, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जिल्हा चिटणीस रामचंद्र कुलकर्णी, बुद्धिजीवी प्रकोष्ठचे पांडुरंग पवार, भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, यांनी नरेंद्र मोदी यांच्या विकासकामे याच्या बद्दल माहिती दिली.   तसेच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमास उद्योग आघाडी सरचिटणीस प्रवीण पाठक, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, ॲड. जहीर चौधरी, परांडा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, भूम महिला मोर्चा ता.अध्यक्ष लताताई गोरे, युवा मोर्चाचे गणेश देशमुख, उत्कर्ष देशमुख, अनिल पाटील, भाऊसाहेब कुटे, हरी महाराज पाथरूडकर, शंकर खामकर, बालाजी कोरे, रमेश बगाडे, विकास जालन, प्रदीप साठे, व भूम तालुक्यातील व शहरातील असंख्य पदाधिकारी व लाभार्थी नागरिक उपस्थित होते.


 
Top