तुळजापूर / प्रतिनिधी- 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील तुळजापूर येथील उपजिल्हारुग्णालयात रुग्णालय  आवारात बसविण्यात येत असलेल्या लिक्विड मेडीकल  आँक्सीजन प्लँटचे काम प्रगतीपथावर असुन ,या आँक्सीजन प्लँटमुळे   उपजिल्हारुग्णालय आँक्सीजन बाबतीत स्वंयपुर्ण होणार आहे. कोरोना दुसऱ्या टप्प्यात आँक्सीजनची प्रचंड कमतरता भासल्याने अनेकांना आपले प्राण सोडावे लागत होते. आगामी कोरोना तिसऱ्या टप्याच्या पार्श्वभूमीवर व आँक्सीजन बाबतीत स्वंयपुर्ण होण्यासाठी येथे शासनाने हा आँक्सीजनप्लँट कार्यान्वित केला आहे.

 ऑक्सिजन प्लँटचे काम प्रगतीपथावर असून  सदरील आँक्सीजन प्लँटसाठी ७४ लाख रुपये खर्च येत असुन राज्य शासनाच्या योजनेतुन केमिकल पासुन यात आँक्सीजन निर्मिती होणार आहे तसेच याच शेजारी केंद्र सरकारचा हवेतुन आँक्सीजन निर्मिती प्लँट होणार आहे.  जि.व्ही.एस.इंडिया प्रायवेट लिमिटेड (बारामती) या कंपनीने हे काम घेतले आहे.  13 के.एल. क्षमता असणाऱ्या सदरील प्लँट मुळे तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय,कोविड सेंटर यांना ऑक्सिजन बाबतीत चिंता राहणार नाही,१३केएल आँक्सीजनप्लँट मधुन १२०० ते १४०० सिलेंडर भरेल इतका आँक्सीजन मिळतो शंभर बेडचे उपजिल्हारुग्णालय कोरोनाने फुल्ल झाले तरी यातुन पंधरा दिवस पुरेल एवढा आँक्सीजन मिळत असल्याने हा आँक्सीजन प्लँट कोरोनाच्या तिसऱ्या टप्प्यात जीवनदायी ठरणार आहे.या आँक्सीजन प्लँटसाठी  उपजिल्हारुग्णालयाच्या वैद्यकीय  अधिकारी डाँ .चंचला बोडके, डाँ. श्रीधर जाधव, रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद कंदले हे लक्ष ठेवुन आहेत.


 
Top