उस्मानाबाद / प्रतिनिधी-

गवळी गल्लीतील , गणेश मंडळामध्ये माझ्या वडिलांचे योगदान,मार्गदर्शन केले.1984पूर्वी मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापन्नेची मिरवणूक किंग्ज काॅर्नरपासून निघत असे हाच माझ्या कुटूंबाचा मान आहे.मंडळ विविध क्षेत्रात क्रीडा,सांस्कृतिक,प्रबोधनात्मकब देखावे,ज्वलंत समस्यावर ,शासकिय,सामाजिकमोहिम,व चळवळ,पोलिओ,कोविड लसीकरणात सहभाग, बालविवाह-स्त्रीभ्रूणहत्या रोखा,स्वच्छता -पर्यावरण बचाव इ.अग्रेसिव असते.निस्वार्थपणामुळेच मंडळ 57 वर्षे अखंडपणे सेवा करित आहे.सेवाश्रेष्ठता ठरते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी केले. 

गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या मानाचा गणपतीच्या पूजाविधी व सन्मानार्थी नगरपरिषदेचे अध्यक्ष मकरंद राजेनिबाळकर,शासकिय दवाखाना शल्यचिकीत्सक डाॅ. धनंजय पाटील, डाॅ.गणेश पाटील, अॅड.दिलीप मराठे,अॅड. श्री व सौ.शशांक गरड यांच्या हस्ते तसेच काशिनाथ दिवटे यांच्या मंत्रोच्चारात संपन्न झाली.यावेळी मंडळाच्यावतीने मकरंद राजेनिंबाळकर,कोरोना योध्दा प्रशासक डाॅ. धनंजय पाटील, डाॅ. गणेश पाटील,अॅड.दिलीप मराठे,अॅड.श्री/सौ.शशांक गरड यांचा सत्कार मंडळाच्यावतीने करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष बोलत होते. 

अॅड.गरड व अॅड.दिलीप मराठे यांनी आपले विचार मांडले.   नंदकुमार हुच्चे,अतूल ढोकर,श्रीकांत दिवटे,वरूण साळुंके, विश्वास दळवी,मुझेमिल पठाण,मनोज अंजीखाने, दिवटे,संकेत-छोटू तिर्थकर यांनी परिश्रम घेतले. आभार राजकुमार दिवटे यांनी तर सूत्रसंचलन प्रा.भालचंद्र हुच्चे यानी केले. 

 
Top