तुळजापूर / प्रतिनिधी- 

येथील आयसीआयसीआय बँक मध्ये 63 तोळे बनावट सोने तारण ठेवुन पैसे उचलुन बँकेची 17,70,851 रुपयेची फसवणुक केल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असुन त्यांच्या कडुन बनवाट सोन्यासह १३५१०० रुपये जप्त केले असुन तसेच आरोपीने ३२१५१६ रूपये बँकेत भरणा केल्याने ,एकुण ४५६६१६रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

या बाबतीत अधिक माहीती अशी की,  येथील आयसीआयसी बँकेत ६३ ताेळे बनावट सोने बँकेत तारण ठेवून पैसे उचलून बँकेची १७७०८५१ रुपयाची फसवणूक केल्याची फिर्याद शाखाधिकारी सुनील क्षिरसागर यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.या प्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात  शाखाधिकारी श्री सुनील क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन पोस्टे गुरंन 290-21 क 420,511,34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या प्रकरणी मा.श्री राजतीलक रोशन पोलीस अधिक्षक उस्मानाबाद , अप्पर पोलीस अधिक्षक मा श्री संदीप पालवे , श्रीमती अंजुम शेख , उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पो नी काशीद   यांचे मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर कांबळे , व त्यांचे पथक पोहेकॉ सोनवणे , पोना यादव , पोकॉ सावरे , पोकाँ साळुके पोकाँ ससाणे , पोकॉ पवार यांचे पथकाने आरोपी सददाम शेख , यास मोहोळ येथुन दिनांक 07 सप्टेंबर 2021 रोजी अटक केली . तसेच आरोपीचे इतर साथीदार रशीद अल्लाउददीन नदाफ (रा. आरबळी ता. तुळजापुर) व कोंडाजी हारुण खुदादे (रा. इटकळ ता.तुळजापुर) , यांना दि .11 सप्टेंबर 21 रोजी अटक करण्यात आली आहे.आरोपी अब्बास राजु पठाण (रा. इटकळ गल्ली ता. तुळजापुर) यास दि .14  सप्टेंबर   21 रोजी इटकळ (ता . तुळजापुर) येथुन अटक करण्यात आली . सदर आरोपी कडुन बनावट सोन्यासह 1,35,100 रुपये जप्त करण्यात आले आहे तसेच आराेपी यांनी बँकेत 3,21,516 रु. भरणा करण्यात आले असुन तरी असे एकुण 4,56,616 रु हस्तगत करण्यात आले आहेत. 


 
Top