क्रांतिकारी संत कवयित्री या पुस्तकाचे लोकार्पण 

 

परंडा / प्रतिनिधी :- 

महाराष्ट्राच्या विकासामध्ये संतांचे आणि समाजसुधारकांचे अनमोल अनमोल योगदान लाभले आहे, असे मत सोलापूर येथील बुर्ला महिला महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ श्रुतीश्री वडगबाळकर यांनी दि. ३ सप्टेंबर  रोजी व्यक्त केले. 

शेती व ग्रामीण विकास संशोधन मंडळ आसु आणि शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या क्रांतिकारी संत कवयित्री या पुस्तकाचे लोकार्पण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त्या बोलत होत्या   

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी येथील विश्वस्त व माजी प्राचार्य डॉ चंद्रकांत मोरे ,ज्येष्ठ साहित्यिक शब्बीर मुलानी ,यांच्या उपस्थितीमध्ये आणि डॉ श्रुतीश्री वडगबाळकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी शब्बीर मुलानी डॉ चंद्रकांत मोरे यांनी आपली मनोगते व्यक्त केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर प्रास्ताविक प्रा अंकुश शंकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी शेती मंडळाचे सचिव विलास वकील, आपलं घर चे कार्यकर्ता कानडे आप्पा ,सचिव गुंडू पवार ,शेती मंडळाचे सदस्य लिमकर, एकल महिला संघटनेच्या आणिताई नवले, सोलापूर येथील वसुमती माळवी ,आरती काळे यांची उपस्थिती होती.

 पुस्तक प्रकाशन झाल्यानंतर लेखिका प्राचार्या डॉ दीपा सावळे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, क्रांतिकारी संत कवयित्री एक पुस्तक लिहिण्यामागचा हेतू असा होता की समाजामध्ये स्त्रियांचं स्थान वरचेवर वाढत चाललेला आहे समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत स्त्रियांचे स्थान माहीत व्हावे या उद्देशाने ज्यांनी समाज प्रबोधन केले आहे अशा क्रांतिकारी संत कवित्री यांच्या नावे पुस्तक लिहावे म्हणून माझा हा प्रपंच होता .  

 कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ महेशकुमार माने, प्रा संतोष काळे, डॉ विशाल जाधव , डॉ राहुल देशमुख, प्रा दीपक तोडकरी, डॉ नलवडे यांनी केले . शेवटी कार्यक्रमाचे आभार डॉ विद्याधर नलवडे यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली .


 
Top