उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे शेतकरी मदत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ  दिवेगावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, कृषी उपसंचालक उपेंद्र काशिद, शिवार फौंडेशन मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक हेगाणा यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 मागील वर्षीपासुन शेतकरयांना विविध अडचणीमुळे नुकसान होत आहे. चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी मदत कक्ष, शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून अडचणी समजून सल्ला, मार्गदर्शन, समुपदेशनाद्वारे शासकीय, सामाजिक संस्था इत्यादींच्या समन्वयातून जिल्ह्यातील शेतकरयांना दिलासा देणे, शेतकऱ्यांचा फोन आल्यानंतर शेतकऱ्याला मानसिक पाठबळ, समुपदेशन दिले जाईल.शिवार हेल्पलाईनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे विविध प्रश्न शेतकरी सन्मान निधी,वीज,शेतरस्ता,बियाणे उगवण,खत,किसान क्रेडिट कार्ड व तसेच पीककर्ज, कृषी विभाग विविध योजने बाबत माहिती व अडचणी यांचे मार्गदर्शन सोडविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. जिल्हासाठी सोमवार ते शनिवार सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेसाठी शिवार हेल्पलाईन ८९५५७७१११५ सुरु करण्यात आली आहे. हेल्पलाईन सेवा शेतकऱ्यांसाठी मोफत असणार आहे. शेतकरयांनी शिवार हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आव्हान शेतकरी मदत कक्षाकडुन करण्यात आले आहे.

 
Top