उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद व कळंब तालुक्यातील अनेक गावातील पीक पाहणी केल्यानंतर बाधित क्षेत्रातील सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावीच लागेल ही भूमिका आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी मांडली.

 सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे मोठ्या क्षेत्रावर अनेक दिवसांपासून सोयाबीन पिकात पाणी साचलेले आहे व शेंगा काळ्या होणे, बुरशी लागणे, कोंब फुटणे याला सुरुवात झालेली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हातात काहीच लागणार नाही. उलट काढणीचा खर्च माथी पडणार आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर हा आर्थिक फटका अनेकांसाठी असह्य राहणार आहे. ठाकरे सरकारने आपली आजवरची निष्ठूरता बाजूला ठेवून माणुसकीच्या नात्याने व परिस्थितीचे वास्तव तथा गांभीर्य लक्षात घेऊन सरसकट अनुदानच नाही तर पीक विम्याची सरसकट नुकसान भरपाई देखील तातडीने जाहीर करावी.

 गतवर्षीच्या पीक विम्याचा अजूनही पत्ता नाही. पण किमान दिवाळीच्या आधी तरी ती रक्कम मिळायलाच हवी, अशी भावना गावोगावी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या दुर्दैवी नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीने खचून जाऊ नका, एकत्रितपणे, आक्रमकपणे आपल्या हक्काचे अनुदान व नुकसान भरपाई आपण नक्कीच मिळवून घेऊ, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील   यांनी व्यक्त केला.

 ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करताना अडचण येत असेल तर कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे रीतसर ऑफलाईन अर्ज करावा आणि पोहोच घ्यावी असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी शेतकऱ्यांना केले. 

 दौऱ्या दरम्यान तेरणा नदीकाठच्या कळंब तालुक्यातील वडगाव (ज), चोराखळी, सापणाई, उपळाई, येरमाळा, वाशी तालुक्यातील तेरखेडा तसेच उस्मानाबाद तालुक्यातील तुगाव, मुळेवाडी, तेर, वाणेवडी, कोळेवाडी, डकवाडी या नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, सभापती दत्ता देवळकर, विकास बारकूल, रामहरी शिंदे, जिल्हा परिषद सदस्य मदन बारकूल, पंचायत समिती सदस्य भगवान ओहाळ, उत्तमराव टेकाळे, खंडेराव मैंदाड,  शिवाजी बाराते, पोपट जेवे, ऍडव्होकेट विष्णू डोके, अनिल भुतेकर, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी, बाबुभाई,  गोपाळ कदम, बापू नाईकवाडी, बबलू मुलानी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top