उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव श्री मसूद शेख यांची देशामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या जमियत ए-उलेमा हिंद संघटनेच्या मराठवाडा सचिवपदी निवड झाल्याबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या हस्ते ‘वेदबाग’ निवासस्थानी सत्कार करण्यात आला. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी नुतन मराठवाडा सचिव मसुद शेख यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देताना जमियत ए-उलेमा हिंद संघटनेच्या माध्यमातून आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यात चांगले कार्य करावे यासाठी शुभेच्छा दिल्या व या संघटनेला लागेल ती मदत करण्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष खलील पठाण हे ही उपस्थित होते.

 
Top