उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन व भारताचे कणखर पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस याचे औचित्य साधून भारतीय जनता युवा मोर्चा, धाराशिव यांच्यावतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, येरमाळा येथे कोरोना योद्धा सन्मान व वृक्ष लागवड हा सेवा समर्पण अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कार्याची माहिती अंतर्गत नव भारत मेला या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मकरंद पाटील यांनी केले होते. आरोग्य कर्मचारी व आशाताई यांना सन्मानपत्र व त्यांना वृक्ष भेट देऊन   पंतप्रधान यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  

कोरोना योद्द्यांचा सन्मान व वृक्षारोपण विषयी चे महत्व व गरज शिवाजीराव गिड्डे-पाटील यांनी व्यक्त केली. तसेच मकरंद पाटील यांनी वृक्ष संगोपन करणाऱ्या कर्मचारी व आशाताईंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सत्कार केला जाईल याची ग्वाही दिली. युवा मोर्चा समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असतो तसेच कोरोना काळात युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी देखील आपल्या प्रामाणेच स्वतःच्या आरोग्याची पर्वा न करता लोकांच्या मदतीसाठी धावून आले व त्यांनी देखील अतुलनीय कार्य केले तसेच यापुढेही आमचे कार्यकर्ते आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतील अशी अपेक्षा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी बोलून दाखवली. अध्यक्षीय भाषणात जि. प. सदस्य मदन बारकुल यांनी कठीण काळात काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यावर आरोग्य कर्मचारी व आशाताई यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश देशमुख यांनी केले.  यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मा. राजसिंहा  राजेनिंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य मा. मदन बारकुल, समर्थ बुथ अभियान लोकसभा विस्तारक शिवाजीराव गिड्डे-पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, गिरीश पानसरे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटे, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस संजय जाधवर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस गणेश देशमुख, निलेश दिवाने, येरमाळा चे सरपंच तबस्सुम सय्यद, चोराखळीचे सरपंच खंडेराव मैंदाड, उपळाईचे सरपंच मुंडे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. बीरादार, डॉ. महातो, डॉ. तामने, प्रयोग शाळा तंत्रज्ञ संजय कराड आरोग्य कर्मचारी तसेच आशाताई उपस्थित  होते.

 
Top