उस्मानाबाद / प्रतिनिधी-

पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या वाढदिवसा निमित्ताने बेंबळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध सेवा कार्याचे आयोजन करण्यात आले आहे.यातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 सेवा समर्पण अभियान  या बेंबळी ता.जि. धाराशिव येथे खंडोबा मंदिर परिसरात सरपंच वंदनाताई नवनाथ कांबळे,माजी सरपंच मोहन खापरे, पांडू पवार, राजाभाऊ सोनटक्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना भाजपा सोशलमीडिया चे कंटेंट रायटर पांडुरंग पवार यांनी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिनाची व मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तीमत्वाची अधिक माहिती दिली.तद्नंतर  मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही पेनचे वाटप करण्यात आले. राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत राजाभाऊ रसाळ,भाजपा नेते,सतीश मोटे, भास्कर बोंदर, नितीन डोने, विष्णु यादव,नाना गावडे,राजाभाऊ शिडुळे, शामराव व्हनसनाळे,अशोक माळी,शिवाजी गावडे,कालिदास कसबे,नितीन कसबे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजित खापरे,अनिल दाणे यांनी परिश्रम घेतले.

 
Top