आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर असेलल्या टी-११ ते निसारी तांडा (औराद ते औराद तांडा ) रस्त्याची दर्जोन्नती / सुधारणा करणे , किंमत २ कोटी ९१ लक्ष रु. या कामाचे भूमिपूजन आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवा नेते किरण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या रस्त्यामुळे औराद, औराद तांडा व भुसणी येथील नागरीक, शेतकऱ्यांना पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण औराद गावात निर्जंतुकीकरण करण्याच्या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. मिकॉन इंडस्ट्रीज, लातूर यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमास तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, बाजार समितीचे संचालक तानाजी भिसे, तंटामुक्ती उपाध्यक्ष शेषेराव शिंदे, शिवसेना शाखाप्रमुख नागेश गायकवाड, मारूती गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, योगेश पाटील, संभाजी सुर्यवंशी, दिनकर शिंदे , कमलाकर सुर्यवंशी, विनोद पाटील, जितेंद्र कदम, माधव रणखांब, ग्रामसेवक गणेश माळी, युवा सेना शाखाप्रमुख जितेंद्र कदम , प्रवीण जाधव, रणजित गायकवाड, बालाजी गायकवाड, मुरलीधर शिंदे, परमेश्वर सोमवंशी, रमेश कारभारी, बालाजी पाटील, सुधाकर गायकवाड, धनराज भिसे, गोपिनाथ गायकवाड, संजय स्वामी, गणेश कारभारी, दिलिप राठोड, प्रदीप पवार, प्रसाद गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.