उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्ह्याचे धाराशिव हे नाव पूर्ववत व्हावे यासाठी गुरूवार दि. २३ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले.   पूर्वीपासून हिंदुराष्ट्र सेनेच्या माध्यमातून जिल्हाभरात विविध तालुक्यात नामांतर करण्यासाठी वेळोवेळी शासनास निवेदन देऊन मागणी केली आहे. परंतु अद्याप सरकारने सकारात्मक पाऊल न उचल्याने आज जिल्हाधिकारी कार्यालय,धाराशिव येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

 सदर आंदोलनास श्रीशिवप्रतिष्ठान,बजरंग दल,विश्वाहिंदुपरिषद,नाभिक संघ या संघटनांचा पाठिंबा होता.  यावेळी महंत मावजीनाथ महाराज,महंत व्यकंटअरण्य महाराज,विक्रम साळुंके, संजय सोनवणे,यशवंत सूर्यवंशी,अजिंक्य मुंडे,सुदर्शन वाघमारे,अनिल पवार,सौरभ कदम यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच यावेळी जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.  सर्वांचे आभार जिल्हा संघटक परीक्षित साळुंके यांनी व्यक्त केले.


 
Top