उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्हयातील न्यायालयीन प्रलंबित,तसेच वादपूर्व प्रकरणांमध्ये झटपट न्यायालयीन निर्णय व्हावेत,या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने शनिवार,दि.25 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हा न्यायालय,तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये लोक अदालतीचे आयोजन केले आहे.

 राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये दिवाणी,मोटार अपघात व फौजदारी स्वरुपाची एकूण 7081 ठेवण्यात आले आहेत.वाहन कायदा 1988 अन्वये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होणाऱ्या वाहनांची 4936 प्रकरणे,नगर परिषद आणि ग्रामपंचायत हद्दीतील 908 प्रकरणे,बॅक वसुलीची 9875 प्रकरणे असे एकूण 15719 वाद दाखल पूर्व प्रकरणे लोक अदालतमध्ये मिठवण्याकरिता ठेवण्यात आली आहेत.मोटार वाहन कायद्याअंतर्गतची या प्रकरणे सामंजस्याने लोकअदालतीमध्ये न मिटल्यास संबंधित पोलिस अधिकारी या वाहन चालकांच्या विरोधात न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करु शकतात.

दिवाणी आणि अदाखलपात्र गुन्हयांच्या बाबतीत,तसेच तंटामुक्ती समितीसमोर वाद मिटला असल्यास त्याबाबत निवाडा घेण्यासाठी लोकांना आणि पक्षकारांनी पुढे यावे, असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधिश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष के.आर.पेठकर आणि वरिष्ठ न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे सचिव वसंत यादव यांनी केले आहे.


 
Top