उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्याभरात मागील काही दिवसात होत असलेल्या सततच्या पावसामुळे शेतीपिकांचे आणि घरांचे अतोनात नुकसान झाले आहे. दि.२५ सप्टेंबर रोजी कळंब तालुक्यातील  मलकापूर,  शेलगाव ज,  संचितपुर,  सापणाई या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची, घरांची पडझड झालेल्या भागाची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद उर्फ नंदूभैय्या राजेनिंबाळकर तालुकास्तरीय अधिकाऱ्यान समवेत पाहणी केली. 

 मलकापूर ता.कळंब येथिल श्री.तुळशीदास नरसिंग चंदनशिवे यांच्या घराचे पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने खासदार व आमदार यांनी घराची पाहणी करून त्यांना धीर दिला. तसेच पंचनामा करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकरी बांधवाना नुकसानीची ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन केले. आपण केलेल्या नोंदणी व योग्य ती कार्यवाही होऊन आपल्याला नुकसान भरपाई मिळण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर आणि केंद्रस्तरावर सातत्याने प्रयत्नशील राहू असा विश्वास यावेळी दिला. शेतकऱ्यांना सांगितले. तसेच 24 तासात 65 मि.मी पेक्षा जास्त पाऊस झालेल्या पिकांचे संयुक्त पंचनामे करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करावयाची शेतकऱ्यांना अडचणी येत असल्यास त्यांची ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारून अर्जाची प्रत संबंधित प्रत्येक शेतकऱ्याला द्यावी असेही तलाठी, कृषी सहाय्यक, विमा प्रतिनिधी यांना खासदार ओमराजे निंबाळकर निर्देश दिले. 

 यावेळी गटविकास अधिकारी श्री चकोर साहेब, तालुका कृषी अधिकारी श्री जाधव साहेब, शेलगाव ज.चे माजी सरपंच बाबुराव तवले, सरपंच विनोद तवले, दहिफळचे सरपंच चरणेश्‍वर पाटील, लोमटे गुरुजी, समाधान बाराते, अशोक हावळे, वसंत धोंगडे यांच्यासह संबंधित गावांचे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सरपंच - उपसरपंच यांच्यासह शेतकरी आणि नागरिक उपस्थित होते.

 
Top