वाशी / प्रतिनिधी-

 शहराला लागून आसलेल्या एक शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून दगडा सारखा सोनेरी रंगाचा एक तुकडा जमीनीवर पडला आहे .

मिळालेल्या माहितीनुसार वाशी  येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी प्रभू निवृत्ती माळी हे शहरालगत असलेल्या आपल्या शेतामध्ये दि २४ रोजी  सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात  भाजीपाला काढण्यासाठी  गेले होते. यावेळी अचानकपणे अकाशातून सुसाट आवाजात  जवळपास दोन ते अडीच किलो वजनाच्या सोनेरी रंगाचा कठीण दगड प्रभू निवृत्ती  माळी यांचे जवळ अगदी सहा फूटावर येवून जोरात पडला.  त्या शेतकऱ्याचे  नशिब चांगले  म्हणून त्यांचा जीव वाचला. त्यांनी थोडा वेळ थांबून सदर दगड उचलला व बोअर च्या पाण्याने धुवून घरी घेऊन गेले व घडलेला प्रकार आपल्या मुलांना फोन वरून सांगितला त्यांच्या मुलांच्या सांगण्या वरून त्यांनी तो सोनेरी दगड वाशी तहसिल मध्ये नेऊन वाशी तहसीलचे  अव्वल कारकुण सचिन  पाटील यांच्या कडे तहसिल मध्ये जाऊण दिला व झालेल्या प्रकाराची माहीती या शेतकऱ्याने अव्वल कारकून सचिन पाटील यांना सांगितली लागलीच अव्वल कारकून यांनी भू वैज्ञानिक उस्मानाबाद यांना या बाबत माहिती दिली व तलाठी वाशी यांना घटना स्थळाची पाहणी करण्याचे आदेश दिले .त्यानुसार तलाठी अशोक राठोड यांनी घटनास्थळाची पाहणी करून तहसील कार्यालय वाशी यांना माहिती दिली .त्या अनुशंगाने दि २५ रोजी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम ठाकूर यांनीहि  स्थळ पाहणी करून घाबरण्याचे काही कारण नाही असे सांगितले . ह्या दगडाची दिवासभर शहरात चर्चा चालू होती .

 काल झालेल्या घटनेची प्रथम दर्शी पाहणी केली असता उल्कापाताचे जे निष्कर्ष आहेत ते दिसून येत नाहीत सर्व गोष्टींचा अभ्यास करून दोन दिवसात अंतिम निर्णय देण्यात येईल. 

-वरिष्ठ भूवैज्ञानिक बी.एम ठाकूर  

 
Top