उस्मानाबाद / प्रतिनिधी-

भारतीय जनता युवा मोर्चा उस्मानाबादच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन केले गेले. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झालेल्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. दिनांक 25 व 26 सप्टेंबर 2021 रोजी आरोग्य विभागाची वर्ग क आणि ड ची होणारी आरोग्य परीक्षा आदल्या दिवशी रात्रीच्या वेळी रद्द करण्याचा दुर्दैवी निर्णय राज्य सरकारने केला आहे. या निर्णयाविरुद्ध राज्यभरात विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.याची दखल घेऊन राज्य सरकारने पुढील दोन दिवसात परीक्षेची पुढील तारीख जाहीर करावी त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मदत करावी व अशी मागणी करुन पुढील तीन दिवसात परीक्षेची तारीख निश्चित करून प्रसिद्ध करावी, अन्यथा भाजयुमो तर्फे राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल. या सर्व गलथान कारभाराला जबाबदार असणारे आरोग्य मंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्वरित राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.  

 ही परिक्षा दिल्ली न्यासा नावाच्या खाजगी एजनसीला परिक्षा घेण्याचे कॉन्ट्रेक्ट दिल्याचे समजते. महाराष्ट्र शासनाने कमीशन खान्याच्या नादात अशा बोगस संस्थांना कामा न देता महाराष्ट्रातील नामांकीत एम.के.सी.एल. व एम.पी.एस.सी.च्या माध्यमातुन या परिक्षा घेण्यात याव्या. हि अग्रहची मागणी परिक्षार्थींकडुन करण्यात आली. त्याचबरोबर संबंधित अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. 

 यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, उपनगराध्यक्ष अभय इंगळे, दुर्गाप्पा पवार, पांडुरंग  पवार, तालुकाध्यक्ष ओम नाईकवाडी, आत्मनिर्भर भारत जिल्हा संयोजक सचिन लोंढे, विनोद निंबाळकर, अमोल राजेनिंबाळकर, अमित कदम, प्रीतम मुंडे, भाजपा विद्यार्थी जिल्हा संयोजक विशाल पाटील, सुरज शेरकर, सुजित साळुंके,  गिरीश पानसरे, गणेश एडके, विकास पवार, मनोज सिंह ठाकुर, प्रसाद मुंडे, काशिनाथ राजपूत, ज्ञानेश्‍वर चव्हाण, सार्थक पाटील, स्वप्नील नाईकवाडी, हिम्मत भोसले, वैभव मुंडे, सागर दंडनाईक, चंद्रकांत मुंडे, यांच्यासह अनेक परिक्षार्थी व भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिवचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top