परंडा /प्रतिनिधी : -

 येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.सचिन चव्हाण यांना डॉ.आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाने पीएचडीचे संशोधन मार्गदर्शक म्हणून नुकतीच मान्यता दिली आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पत्र डॉ.सचिन चव्हाण यांना प्राप्त झाले आहे.डॉ.चव्हाण यांना पीएचडीचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्यामुळे श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सावळे ,आई क्यू ए सी चे डॉ. महेशकुमार माने ,स्टाफ सेक्रेटरी डॉ. शहाजी चंदनशिवे, वनस्पतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश सरवदे कार्यालयीन अधिक्षक भाऊसाहेब दिवाने तसेच महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले डॉ.सतीश चव्हाण यांना विद्यापीठाने मान्यता दिलेल्या चार संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे .


 
Top