तुळजापूर /प्रतिनिधी 

- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील सिध्द गरीबनाथ दशावतार मठात श्रावण मासात दररोज  नवनाथ पोती वाचन श्रवण  केले जाते याचा सांगता सोहळा शनिवार दि ४ रोजी महाआरती व महाप्रसाद वाटप करुन संपन्न झाला.

प्रथमता नवनाथ पोथी वाचनचा शेवटचा अध्याय वाचण्यात आला नंतर सिध्दगरीबनाथदशावतार मठाचे मठाधिपती मंहत मावजीनाथ गुरु तुकनाथ बुवा यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी श्रीतुळजाभवानी चे महंत तुकोजीबुवा मंहत हमरोजी बुवा महंत सोमवारगिरी  महाराज महंत दत्तअरण्य महाराज मंहत वाकोजीबुवा अदि महंत सह संत मंडळी उपस्थितीत होते.

त्यानंतर प्रथम मंहत साधु संताना महाप्रसदाचा लाभ दिला गेला नंतर दशावतार मठाचा भक्तशिष्यगणांनी  महाप्रसादाचा लाभ घेतला . सिध्दगरीबनाथदशावतार मठात मंहत गरीबनाथ महाराजांची जीवंत समाधी असुन या समाधीवर महादेवाची पिंड असुन यावरश्रावणात दररोज बेलपञ मंञोपचार गजरात वाहले जातात श्रावणात सवालाख मंञोपचार गजरात तीनपानी बिलपञ अर्पण केले जातात हीपरंपरा पुरातन असुन आजही याचे श्रावणात  आजही पालन केले जाते.


 
Top