तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानीच्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभुमीवर तुळजापूर शहरात दि.२७ रोजी सोमवार या  एकाच दिवशी विविध चार ठिकाणी लसीकरण महाअभियान आयोजीत केल्याची माहीती नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दिली.

 आजवर उपजिल्हा रुग्णालय व नगर परिषद तुळजापूरच्या संयुक्त माध्यमातुन आरोग्य कर्मचारी ,फ्रंन्टलाईन वर्कर १८ ते ४४ तसेच ४४ पुढील जेष्ठ नागरीक गरोदर माता सर्व मिळुन आजवर ३०,००० पेक्षाही जास्त नागरीकांना लसीकरण केले आहे . हे लसीकरण शहरात  विविध ठिकाणी स्मार्ट लसीकरण केंद्र करुन नागरीकांना शक्य त्या ठिकाणी भेट वस्तु देऊन हे लसीकरण अभियान तुळजापूर शहर १००% कोरोना मुक्त करण्याच्या दृष्टीने यशस्वी केले आहे. याच पार्श्वभुमीवर उद्या दि २७-०९-२०२१ रोजी सोमवार शहरात श्री तुळजा भवानी मंदीर प्रशासकीय इमारत,सराया धर्मशाळा कमान वेस,नविन बस स्थानक लातुर रोड ,सावित्री बाई फुले विद्यालय (लोकशाहीर आण्ण भऊ साठे नगर) या ठिाकाणी१८ वर्षा वरील नागरीकांना लसीकरण होणार आहे. तरी याचा शहरातील व्यापारी,पुजारी,व नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  नगराध्यक्ष सचिन रोचकरी,रुग्णालय अधीक्षक चंचला बोडके मॅडम,युवा नेते विनोद   गंगणे,आनंद  कंदले, रुग्ण कल्याण समिती सदस्य यांनी केले.

 
Top