उस्मानाबाद / प्रतिनिधी-
महाराष्ट्राचे राजकारण सध्या संक्रमणाच्या स्थितीतून जात आहे. राजकारणाची पातळी खालावली असून, रोज सकाळी- सकाळी उठून पेपरमध्ये पहावं लागतं आज कोणाचा नंबर आहे, अशी चिंताजनक प्रतिक्रिया माजी मंत्री संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाटेल तोपर्यंत हे महाविकास आघाडी सरकार टिकणार आहे, अशी टिप्पणी ही केली. 
 बंजारा समाजाच्या प्रश्नासंदर्भात ते सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यानिमित्त ते उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दि. २६ सप्टेंबर रोजी आले होते. यावेळी विरोधकांकडून सुरू असलेल्या आरोपांवरती स्पष्टीकरण देत माझ्यावर देखील संकट आले आहे. मी स्वतः दीन दलीत समाजाला सेवा देण्याचं काम करतो. बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणी प्रमाणे मी काम करत होतो. मात्र, माझी 30 वर्षाची सामाजिक आणि राजकीय कारकीर्द विरोधकांनी उधळून फेकून दिली आहे. माझी चौकशी होऊ द्यायला हवी होती. यावेळी राठोड यांनी सध्या सरकार स्थिर आहे. मात्र ते टिकवायचे का नाही, अन्‌ किती काळ टिकवायचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. मुख्यमंत्री चांगले काम करीत असून देशभरात त्यांचे कौतुक केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. 
 मात्र, तत्पूर्वीच माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच तुम्हीच आरोप करता, तुम्हीच फाशीवर लटकावा म्हणता आणि तुम्हीच न्यायाधीश होता, असे म्हणत हे महाराष्ट्रातील बदलत गेलेलं हे राजकारण कुठ तरी थांबल पाहिजे. महाराष्ट्राची राजकारणातील वैभवशाली परंपरा जपली पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे.
यावेळी डाॅ.टी.सी.राठोड, गुलाबराव जाधव यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

 
Top