प्राचार्या डॉ. दीपा सावळे यांनी केला सत्कार 


परंडा /प्रतिनिधी :-

  दिनांक ३१ रोजी येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ.अरुण खर्डे आणि ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाचे संशोधन मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाने मान्यता दिली आहे.डॉ.अरुण खर्डे यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये तर डॉ. राहूल देशमुख यांना ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयांमध्ये संशोधन मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. दोघांच्या नियुक्तीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिपा सावळे मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

सत्काराला उत्तर देताना डॉ.अरुण खर्डे आणि डॉ. राहुल देशमुख यांनी सांगितले की आम्ही प्रामाणिकपणे विद्यापीठाने दिलेली जबाबदारी पार पाडू.विद्यार्थ्यांना पारदर्शकपणे मार्गदर्शन करू.

डॉ.अरुण खर्डे व डॉ.देशमुख यांना विद्यापीठाने संशोधन मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केल्याबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर  अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दिपा सावळे, महाविद्यालयाचे स्टॉप सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे,आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ.  महेशकुमार माने आणि महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.सत्कार समारंभाच्या प्रसंगी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.हुंबे.सचिन,डॉ.घुमरे, डॉ.विद्याधर नलवडे उपस्थित होते.या दोघांनाही  पीएचडी करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता येणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार डॉ.विद्याधर नलवडे यांनी मानले 

 
Top