उस्मानाबाद / प्रतिनिधी-उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे २० दिवसांपूर्वी झालेल्या सळई चोरी प्रकरणी ढोकी पोलिसांनी तपास करून दोघांना ताब्यात घेतले आहे.

किणी (ता. उस्मानाबाद) येथील पांडुरंग कुंभार यांचे तेर येथे ग्रामीण रुग्णालयासमोर सळईचे दुकान आहे. त्या दुकानातील सळई व सीसीटीव्ही असा दोन लाख ५३ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी ९ व १० ऑगस्टच्या रात्री चोरून नेला होता.

चोरट्यांनी जाताना सीसीटीव्हीची सेव्ह डिस्क घेऊन गेल्याने तपास करणे जिकिरीचे बनले होते. ढोकीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तेर दूरक्षेत्राचे अमंलदार प्रकाश तरटे यांनी तपास सुरू केला. त्यामध्ये सदर चोरी पळसप (ता. उस्मानाबाद) येथील नामदेव निकम व माळकरंजा (ता. कळंब) येथील पांडुरंग लोमटे या दोघांनी केल्याचा संशय बळावला. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बनसोडे, पोलिस नाईक प्रकाश तरटे, गजानन जिनेवाड, गोविंद खोकले यांच्या पथकाने आरोपींसह सळई हस्तगत केली आहे. या प्रकरणातील उर्वरित तपास पेालिस नाईक तरटे करीत आहेत.

मार्गदर्शनाखाली तेर दूरक्षेत्राचे अमंलदार प्रकाश तरटे यांनी तपास सुरू केला. त्यामध्ये सदर चोरी पळसप (ता. उस्मानाबाद) येथील नामदेव निकम व माळकरंजा (ता. कळंब) येथील पांडुरंग लोमटे या दोघांनी केल्याचा संशय बळावला. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक बनसोडे, पोलिस नाईक प्रकाश तरटे, गजानन जिनेवाड, गोविंद खोकले यांच्या पथकाने आरोपींसह सळई हस्तगत केली आहे. या प्रकरणातील उर्वरित तपास पेालिस नाईक तरटे करीत आहेत.

 
Top