उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात १ सप्टेंबर ते 3O सप्टेंबर पर्यंत पोषण महिना साजरा होणार आहे. या पुर्ण महिन्यात पोषण वाटीका तयार करने, गावस्तरावर पारसबाग संदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षीत करून दाखविणे यासोबतच रासायनिक खत व फवारणीमुळे जमीन व हवा दुषीत होऊन कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. यामाध्यमातुन पारसबाग व पोषण वाटीका यातुन कॅन्सरमुक्तीचा संकल्प करण्यात येईल , अशी   माहिती, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी बुधवार दि.१ सप्टेंबर रोजीपत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल गुप्ता, महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला टेकाळे, महिला व बालकल्याण अधिकारी बी.एच निपाणीकर, डॉ. उज्वला कळंबे आदी उपस्थित होते. सुपोषित भारत” या संकल्पनेवर आधारीत शासनाच्या महिला बालकल्याण, आरोग्य, शिक्षण,ग्रामपंचायत, कृषी, पाणीपुरवठा, MSRLM या विविध विभागामध्ये अभिसरण पध्दतीने पोषण अभियान कार्यक्रम देश पातळीवर राबविण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सप्टेंबर २०२१ हा संपूर्ण महिना “राष्ट्रीय पोषण महिना” म्हणून साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात या पोषण माह मध्ये विविध विभागामार्फत विविध उपक्रम घेतले जाणार आहेत व याद्वारे आरोग्य व पोषणासंदर्भात लोकांमध्ये योग्य दृष्टीकोन व जनबदल करणे व लोकांमध्ये चांगल्या पोषणाच्या सवयी निर्माण करण्यासाठी एक व्यापक जन आंदोलन निर्माण करणे हा राष्ट्रीय पोषण महिना साजरा करण्यामागे प्रमुख उद्देश आहे . पोषण महिना मध्ये कोविड-१९ च्या मार्गदर्शिक सुचानांचे पालन करून खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

 पोषण वाटिका तयार करणे, गावस्तरावर पोषण रॅली काढून शुभारंभ, अंगणवाडी केंद्र , शाळा, उपकेंद्र, ग्रामपंचायत तसेच सार्वजनिक जागेवर पोषण वाटिका तयार करणे,  MSRLM मार्फत गावस्तरावर परसबाग संदर्भात मार्गदर्शन व प्रात्यक्षिके,  पोषण वाटिका / पोषण बाग स्पर्धेचे आयोजन, कोविड लसिकरणाबाबत जनजागृती,  मातृ वंदना सप्ताह साजरा करणे,  पौष्टियकतेसाठी योग आणि आयुष, अंगणवाडी स्तर,शाळा,उपकेंद्रे,आणि ग्राम पंचायत स्तरावर स्तनदा माता, गरोदर महिला,किशोरवयीन मुली यांचे करिता आयुष विभागामार्फत योग सत्रांचे आयोजन करणे आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. 

 
Top