उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज पुरग्रस्त भागाच्या नुकसानीची पाहणी केलीय. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे देखील होते.

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज पुरग्रस्त भागाच्या नुकसानीची पाहणी केलीय. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे देखील होते.जिल्ह्यातील पुर परिस्थितीला मोठ्याप्रमाणात झालेला पाऊस कारणीभूत आहे.आम्हा महिनाभराच्या आत नुकसानीचे पंचनामे करुन मदत जाहीर करु अशी माहिती शंकरराव गडाख यांनी दिली. तर गेल्या वर्षीच्या नुकसानाची मदत केंद्रसरकारने दिली नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.

संतप्त लोकांनी पालकमंत्र्यांचा ताफा आढवला

 


अतिवृष्टीची पहाणी करण्यासाठी आलेल्या पालकमंत्री शकरराव गडाख यांचा ताफा पुरग्रस्त शेतकरी व नागरिकांनी आडवून आपल्या विविध आडचणी, समस्या त्यांच्यासमोर मांडून विविध मागण्या केल्या आहेत. यावेळी पालकमंत्र्यांनी सर्वांच्या समस्या, आडचणी, त्यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. 

खा. ओमराजे यांनी मदतीसाठी पंतप्रधान व कृषिमंत्र्यांना पाठविले पत्र


शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी तात्काळ NDRF अंतर्गत निधी देण्यात यावी. व पिक विमा, महसूल, कृषी विभागाने पिकांचे पंचनामे स्वीकारल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पिक विमा मंजूर करून तात्काळ रक्कम देण्यासंदर्भात शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी   व कृषिमंत्री नरेंद्रजी तोमर  यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

 उस्मानाबाद  लोकसभा मतदारसंघातील उस्मानाबाद, कळंब, वाशी, भूम, परंडा, तुळजापूर, उमरगा, लोहारा,  लातूर जिल्ह्यातील औसा व निलंगा तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे सर्व क्षेत्रामध्ये सर्वात मोठया प्रमाणात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे बहुतेक भाग जलमय झाला आहे.   या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील खरिप पिकांचे (सोयाबीन, उडीद, मूग, तूर), गावांत पाणी शिरल्याने घरांची पडझड तसेच जनावरे वाहून जाणे असे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बाधित प्रत्येक कुटुंबाला रु. १०,०००/- चे सानुग्रह अर्थसहाय्य करा - आ. राणा पाटील 


पूर परिस्थितीमुळे बाधित प्रत्येक कुटुंबाला रु. १०,०००/- चे सानुग्रह अर्थसहाय्य तातडीने देणे अपेक्षित आहे. बाधितांनी यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करावी.

गेल्या काही दिवसातील अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीने बाधित कुटुंबांना स्थायी आदेशाप्रमाणे रू. १०,०००/- चे सानुग्रह अर्थसहाय्य तातडीने करणे अपेक्षित आहे.

 कपड्यांच्या नुकसानी पोटी प्रति कुटुंब रुपये ५०००/- रुपये,  घरगुती वस्तू किंवा भांडी यांच्या नुकसानीपोटी रुपये ५०००/-, पुराने बाधित झालेल्या प्रत्येक गावात पंचनामे करण्याची प्रक्रिया चालू आहे.आपल्या बाधित कुटुंबाचे नाव या यादीत असल्याची खातरजमा करणे ही आपली जबाबदारी आहे. जनावरांचे, घराचे, गोठ्याचे, दुकानांचे योग्य पंचनामे होणे अपेक्षित आहे.शेतीच्या नुकसानीबाबत सरसकट अनुदान व विम्याच्या नुकसान भरपाईची आपली मागणी कायम आहे. तरी देखील पंचनामे व पीक कापणी प्रयोग (झाल्यास) यांच्याकडे प्रत्येक गावातील प्रमुखांनी योग्य पद्धतीने व बारकाईने लक्ष द्यावे. अडचण आल्यास ८८८८६२७७७७ या नंबर वर आपण व्हाट्सअप करावे.


 
Top