उस्मानाबाद / प्रतिनिधी-

आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा असुन अशा शिबीरामधुन मानवतेचे दर्शन घडत असून असे शिबीर होणे गरजेचे असुन असे कार्यक्रम घेणाऱ्या संस्थेच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे असे मत माहेश्वरी सभा प्रदेशाध्यक्ष श्रीकृष्ण भन्साळी यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन उस्मानाबाद, संस्कृती प्रतिष्ठान उस्मानाबाद, श्रीकृष्ण गणेश मंडळ उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने एकता संपर्क कार्यालयात आयोजित अत्याधुनिक मशिनव्दारे हाडांची ठिसुळता मोफत तपासणी शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी डॉ.राधाकृष्ण भन्साळी, महात्मा बसेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष श्रीकांत साखरे, व्यापारी महासंघाचे सचिव लक्ष्मीकांत जाधव, अमित मोदाणी, युवराज राजेनिंबाळकर, उमेश राजेनिंबाळकर, मीनल काकडे, अभिषेक बागल, महेश वडगावकर, एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, श्रीकृष्ण गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन भन्साळी, संस्कृती प्रतिष्ठान चे अध्यक्ष राम मुंडे, अलकेम कंपनी चे जिल्हा प्रतिनिधी सचिन करे व विद्याधर पडवळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

एकता, संस्कृती, श्रीकृष्ण गणेश मंडळ नेहमीच समाजोपयोगी उपक्रम घेत असून त्यांचे काम कौतुकास्पद आहे असे मत यावेळी श्रीकृष्ण भन्साळी यांनी व्यक्त केले. यावेळी 120 लोकांनी तपासणी शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेशाची आरती,दीप प्रज्वलन व फीत कापुन करण्यात आली. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा  संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. 

यावेळी नायब तहसीलदार राजाराम केलुरकर, नगरसेवक रवी वाघमारे, संजय मुंडे, मुख्याध्यापक प्रदीप गोरे,अँड.योगेश सोन्ने, जयंत देशमुख, तलाठी अमोल निरफळ, विशाल थोरात, विशाल पाटील, शिवप्रसाद भुत्तेकर, शिवलिंग गुळवे, सुरेश मलकुनाईक, सुनील पगुंडवाले, प्रशांत जाधवर, शाम नवले, माऊली जोगी, सुरज शेरकर, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे,अक्षय गांधी,सचिन बारस्कर, आरेफ शेख, सागर काळे, गौरव बनसोडे व आभिलाष लोमटे आदींची उपस्थिती होती

 
Top