तुळजापूर / प्रतिनिधी-

विघ्नहर्ता श्रीगणेश उत्सवास भाद्रपद शुद्ध चतुर्थी  शुक्रवार दि. १० रोजी आरंभ होणार आहे.यंदा तुळजापूर पोलिस स्टेशन अंतर्गत सार्वजनिक तीन  श्रीगणेश उत्सव मंडळांनी आजपर्यत नोंदणी केली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांचा श्रीगणेश प्रतिष्ठापना कमी राहण्याची शक्यता  आहे. शहरातील दोन  व ग्रामीण भागातील एक आहे.

  घरगुती गणेश उत्सव तसेच महालक्ष्मीगौरी उत्सव  साजरा करण्यासाठी तयारी घरोघरी लगबग वाढली आहे. सध्या बाजारपेठत श्रीगणेश व महालक्ष्मीगौरी उत्सव,पुर्वतयारीसाठी खास करुन महिला वर्ग गर्दी करीत आहे.

यंदा सर्वञ आकर्षक अशा श्रीगणेश मुर्ती विक्रीस आल्या आहेत.तसेच महालक्ष्मीगौरी सणासाठी महालक्ष्मी  मंडप  मुखवटे खेळणी देखावा साहित्य पुजा साहित्य दुकाने सजली असुन येथे खरेदी चालु आहे. भाद्रपद महिन्यात शुक्रवार दि . १० सप्टेंबरपासून  श्रीगणेश आगमनाने उत्सवास आरंभ होणार आहे.  १२ सप्टेंबर रविवार ,महालक्ष्मी  गौरी. १३ सप्टेंबर सोमवार गौरी पूजन करावे . १४ सप्टेंबर मंगळवार गौरी  विसर्जन रविवार दि19रोजी अनंत चतुर्थी  असल्याने यादिवशी श्रीगणेश विसर्जन होणार आहे

 
Top