उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या गेट समोरील नाली व त्यावरील जाळीचे काम अवघ्या 15 दिवसात निकृष्ट असल्याची बाब समोर आल्यानंतर बरीच चर्चा झाली, या प्रकरणातुन झालेल्या नाचक्कीची मलमपट्टी करण्यासाठी या कामाची तात्पुरती डागडुजी करण्याची नामुष्की सार्वजनिक बांधकाम विभागावर आली आहे. 15 ऑगस्ट रोजी सुरू झालेल्या या निकृष्ट कामाचे जिल्हाधिकारी यांना अवघ्या 15 दिवसातच दर्शन झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील हे काम पालकमंत्री, खासदार , आमदार सदस्य असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतुन झाले होते हे विशेष. जिल्हाधिकारी कार्यालयातील कामाची ही अवस्था असेल तर त्यावरून जिल्ह्यातील इतर विकास कामात किती बोगसगिरी झाली याचा अंदाज बांधता येतो. जिल्ह्यातील गुणवत्ता नियंत्रण विभागाच्या अस्तित्वावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुणवत्तापूर्ण विकास कामाच्या गप्पा या भाषणापुरत्या व उपदेश देण्यापुरत्या राहिल्या असुन काही लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या ठरलेल्या टक्केवारी व हप्त्याच्या शिष्टाचारात विकास कामांची माती होत आहे तर कांही गुत्तेदार,काही अधिकारी मालामाल झाले आहेत. 

खड्ड्यांमध्ये रस्ता

जर जिल्ह्यात व्हीआयपी दौरा असेल तर रस्त्यात निर्माण झालेले खड्डे बुजवले जातात. या प्रकारचे काम प्रत्येक व्हीआयपी दौऱ्यात दिसून येते. यावर आतापर्यंत किती खर्च झाला? याचे कोंडे न उलगडणारे आहे. विशेष म्हणजे चार दिवसांनी जरी दुसऱ्या व्हीआयपीचा दौरा असेल तरी परत एकदा खड्डे बुजविण्याचे काम केले जाते. 

 
Top