परंडा / प्रतिनिधी : -

परंडा शाखेच्या ४ था वर्धापन दिनानिमित्त भगवंत प्रतिमेचे पूजन उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे शाखा अधिकारी शिंदे  यांच्या हस्ते करुण वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.   

 परंडा येथे २०१७ मध्ये बार्शी चे उद्योजक व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष ठोंबरे यांनी परंडा येथे भगवंत मल्टीस्टेट चे शाखा स्थापना करण्यात आली होती.परंडा शहर व ग्रामीण भागातील  ग्राहक व ठेवीदार व छोटे मोठे व्यापारी व व्यावसायिक व उद्योजक व यांच्या सहकार्याने आज भगवंत मल्टीस्टेट ५ व्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. भगवंत मल्टीस्टेट सोसायटी ४ वर्षे पूर्ण करून ५ व्या वर्षात पदार्पण  केल्याबद्दल भगवंत मल्टीस्टेट चे शाखा अधिकारी दिलीप ठोंबरे यांचा सत्कार करून पुढिल वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.     यावेळी उस्मानाबाद जनता सहकारी बॅंकेचे शाखा अधिकारी’ शिंदे साहेब , बाबर साहेब व  ॲडव्हेकट वाघमारे, सुनिल पवार भोञेकर ,राजकुमार देशमुख, अमोल गोफणे, प्रतिष्ठित व्यापारी महावीर करळे, हेमंत जगदाळे, धोंडीराम मोहळकर, नरसिंग खैरे, अमोल थिटे,शेख अमन ,जाकीर मोमीन, व भगवंत मल्टीस्टेट चे कर्मचारी शेळके मारूती ,अमरजित पवार, भाऊसाहेब देशमुख, ज्ञानेश्वर लटके, डांगे जनार्धन, गुडे दिलीप, सुनिल आतकर, आदी उपस्थित होते.शेवटी सर्वांचे आभार भगवंत मल्टीस्टेट चे शाखा अधिकारी दिलीप ठोंबरे यांनी  मानले.

 
Top