परंडा / प्रतिनिधी :- 

परंडा पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक सुनिल गिड्डे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार ससाणे, पोलिस कर्मचारी शबाना मुल्ला, रामराजे शिंदे, अजित कवडे, किरण हावळे, गोविंद मोटेगावकर यांनी कोरोना व गणेशोत्सव काळात योग्य नियोजन केल्याबद्दल शिवसेनेचे युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

   यावेळी पोलिस ठाण्यात नूतन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नारायण एकशिंगे, विक्रांत हांगे यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नगरसेवक मकरंद जोशी, डॉ.अब्बास मुजावर, प्रशांत गायकवाड, प्रितम डाके, गणेश जाधव, संतोष गायकवाड, तुकाराम गायकवाड,दत्ता मेहेर, विकास साळुंके, धिरज ठाकूर, सुयोग यादव,वैभव मस्के, अण्णा लोकरे, चिया दिक्षित आदी उपस्थित होते.


 
Top